सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ; पार्थ पवार राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय सूत्रे कुणाच्या हाती
, , , ,

NCP: सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ; पार्थ पवार राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय सूत्रे कुणाच्या हाती

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील (Mumbai) मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची कॅबिनेट मंत्रीपदाची खाती आता कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही तीन महत्त्वाची खाती होती. ही सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच येणार का, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. विधिमंडळातील पद स्वीकारल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार (Parth Pawar) यांची निवड होण्याची शक्यता असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात सुरू आहे. यामुळे अजित पवारांकडे असलेली उर्वरित राजकीय सूत्रेही हळूहळू सुनेत्रा पवार यांच्याकडे केंद्रीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कायद्यानुसार सहा महिन्यांच्या आत राज्यसभा (Rajya Sabha) सदस्यत्वाचा राजीनामा देणे बंधनकारक असल्याचे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्षाला टिकवून ठेवणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, हे मोठे आव्हान आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर असणार आहे. महायुती सरकारमध्ये याआधीही अनेक अंतर्गत राजकीय घडामोडी, कार्यकर्त्यांची फोडाफोडी, पक्षांतर्गत वाद, तसेच महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद पाहायला मिळाले होते. ही सर्व परिस्थिती आता नव्या नेतृत्वाला सांभाळावी लागणार आहे.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सादर करणार असल्याची माहिती आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, (Chagan Bhujbal) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतरच आज सुनेत्रा पवार यांना मुंबईत बोलावण्यात आले असून, आजच त्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय भवितव्य कोणत्या दिशेने जाईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

[sharad pawar, bjp, ncp, ajit pawar, politics, maharashtra, pune, Marathi News, news update, rajya sabha, SunetraPawar, AjitPawar, ParthPawar, NCP, RashtravadiCongress, MaharashtraPolitics, DeputyCM, BreakingNews, PoliticalUpdate, MumbaiNews, Mantralaya, DevendraFadnavis, PrafulPatel, ChhaganBhujbal, SunilTatkare #RajyaSabha #Mahagathbandhan NN360, NewsNetwork360, InstaNews, PoliticalNews

News Network360 Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *