अनिल अंबानी,नंदिता दास, अनुराग कश्यप……. एपस्टीन फाइल्समधून मोठे खुलासे!

भारतीय सेलिब्रिटींच्या नावांची देशभर चर्चा

जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फाइल्समधून काही भारतीय व्यक्तींचे संदर्भ समोर आल्याने देशातही चर्चेला वेग आला आहे. अमेरिकेतील कुख्यात फाइनान्सर आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रे, ई-मेल संवाद आणि संपर्क नोंदी सार्वजनिक झाल्यानंतर या फाइल्सचा अभ्यास केला जात आहे. या कागदपत्रांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावे असून, त्यात काही भारतीय संदर्भही असल्याचे आढळून आले आहे.

याशिवाय वेलनेस लेखक आणि विचारवंत दीपक चोप्रा, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर तसेच अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास यांची नावे काही सामाजिक कार्यक्रमांच्या निमंत्रणांशी किंवा ओळखीच्या संदर्भात फाइल्समध्ये आढळल्याचे वृत्त आहे. मात्र, या कोणत्याही नावांसोबत गुन्हेगारी आरोप, चौकशी किंवा दोषारोप जोडलेले नाहीत.

दरम्यान, तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांच्या मते एपस्टीन फाइल्समध्ये नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरते, असा निष्कर्ष काढता येत नाही. बहुतांश नावे ही संपर्क, ई-मेल संवाद किंवा सामाजिक ओळखीपुरती मर्यादित आहेत. सध्या तरी कोणत्याही भारतीय व्यक्तीविरोधात अधिकृत तपास किंवा कायदेशीर कारवाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवले जाणारे दावे आणि आरोप याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

NewsNetwork360Marathi Bollywood

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *