,

Pune:पुण्यात महाराष्ट्रातील नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवकांचा जाहीर सत्कार समारंभ.

पुण्यात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स च्या वतीने मुस्लिम नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ …..

पुणे : महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित मुस्लिम नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ पुण्यातील सावित्रीबाई फुले सभागृह येथे येत्या रविवारी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांनी पत्रकार परिषदेत केली .

  हा कार्यक्रम रविवार, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह, टिंबर मार्केट, लोहियानगर, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजातील माजी सनदी अधिकारी ,सामाजिक नेते मार्गदर्शक व महाराष्टातील मुस्लिम समाजाचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित नगरसेवकांना मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्ननावर लक्ष वेधण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुस्लिम लोकप्रतिनिधींना एकत्र आणणे, समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची दिशा ठरवणे, तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी सामूहिक भूमिका तयार करणे हा आहे. या माध्यमातून मुस्लिम समाजाची एक मजबूत, संघटित आणि प्रभावी राजकीय भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह आणि ऊर्जा मिळणार असल्याची अपेक्षा संयोजकाकडून व्यक्त करण्यात आली आहे .

Newsnetwork360marathi Pune Maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *