पत्नी-मुलीवरील प्रेम आणि विरह न सहन झाल्याने टोकाचं पाऊल; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे…..
पिंपरी- चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय….पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून केशरी प्रसाद शाहू या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साडेचारच्या सुमारास भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत त्याने जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती. या लाईव्हमध्ये तो पत्नी आणि मुलीची आठवण काढताना भावनिक अवस्थेत दिसत होता. त्याने तीन पानांची सुसाईड नोटही लिहिली असून, पत्नी-मुलीवरील प्रेम आणि विरह सहन न झाल्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं नमूद केलं आहे. या घटनेचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत. काही जनावर त्याने गंभीर आरोप ही केलेत. जे सुसाईड नोटमध्ये नमूद आहेत. त्यांनी पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याने केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भाजी मंडई परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तरुणाने फेसबुक लाईव्हद्वारे केलेले आरोप आणि सुसाईड नोटमधील मजकूर सध्या तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून फेसबुक लाईव्ह, कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेसचीही तपासणी सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणामुळे कौटुंबिक वाद, मानसिक ताण आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून सत्य काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे?
मी केशरी प्रसाद शाहू….
मी पूर्ण शुद्धीत ही सुसाईड नोट लिहीत आहे. माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा सहभाग असून त्यांना तिचं सध्याचं ठिकाण माहीत आहे, असा माझा आरोप आहे. माझे आणि तिच्या वादाचा गैरफायदा घेऊन पत्नी पळवून लावलं आहे. माझ्या मृत्यूस तेच जबाबदार असून मला न्याय हवा आहे. सोनं-चांदी घेतल्याचा आणि मला धमकावल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला नाही, याबाबतही तक्रार आहे. मला पत्नी-मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; विशेषतः मुलीवर माझं अपार प्रेम आहे. ११ नंबर खोलीतील व्यक्तींवरही संशय आहे. हे सर्व चिठ्ठीत नमूद आहे.


Leave a Reply