खुनाचा प्रयत्न प्रकरणातील पाहिजे आरोपीला सिताफिने केले अटक…
पुणे, दि. १४ फेब्रुवारी खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत प्रकरणातील पाहिजे आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक ०२ ने अटक केली आहे. ही कारवाई झोन ०१ हद्दीत करण्यात आली.
खंडणी विरोधी पथक ०२ चे पथक झोन ०१ परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार विनोद महाजन व हवालदार संजय आढरी यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, वानवडी पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक ५१४/२०२५ मधील पाहिजे आरोपी शशा उर्फ साहिल राजेंद्र पिंगळे (वय १९, रा. एस.आर.ए. बिल्डिंग, शिंदे वस्ती, हडपसर, पुणे) हा आलोक नगरी सोसायटी, कसबा पेठ येथे येणार आहे.
या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३५१(२), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले.


Leave a Reply