Pune crime: जेवण बनवण्याच्या वादातून रूममेटवर चाकूने हल्ला, एक गंभीर जखमी
,

Pune Crime:जेवण बनवण्याच्या वादातून रूममेटवर चाकूने हल्ला, एक गंभीर जखमी

पुणे (Pune News): पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ जेवण कोणी बनवायचे, या क्षुल्लक कारणावरून एका रूममेटने दुसऱ्या रूममेटवर चाकूने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात ५४ वर्षीय रामनरेश बुद्धिलाल रावत हे गंभीर जखमी झाले आहेत. (crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, रामनरेश रावत आणि राकेश वर्मा हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून रोजगारासाठी पुण्यात आले होते. मोई परिसरात एका खोलीत ते दोघे एकत्र राहत होते. १६ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दिवसभराचे काम आटोपून घरी परतल्यानंतर जेवण कोणी बनवायचे, यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

हा वाद अचानक इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात राकेश वर्माने घरातील चाकू उचलून रामनरेश रावत यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रामनरेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी जखमी रामनरेश रावत यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी राकेश वर्मा याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मोई परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

NewsNetwork360Marathi