मनसे उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेस–RSS चा एकत्र उल्लेख; मग ‘पिट्या भाई’चं तेव्हा काय चुकलं?
, ,

Pune: मनसे उमेदवाराच्या प्रचारात काँग्रेस–RSS चा एकत्र उल्लेख; मग ‘पिट्या भाई’चं तेव्हा काय चुकलं?

पुण्यातील प्रभाग क्रमांक 29-A मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राम बोरकर यांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि RSS चा एकत्र उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. प्रचारात वापरण्यात येणाऱ्या रिक्षाहि वर “माझा अभिमान, मी संघाच्या कार्यप्रणालीत तयार झालेला स्थानिक कार्यकर्ता,” तसेच मनसे -शिवसेना (उ भा ठा )- काँग्रेस आघाडी चा अधीकृत उमेदवार असा एकत्र उल्लेख केला आहे, तरी मनसेच्या मूळ भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या पार्श्वभूमीवर अनेकांना अभिनेता रमेश परदेशी उर्फ ‘पिट्या भाई’ प्रकरणाची आठवण झाली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातून लोकप्रिय झालेले रमेश परदेशी मनसेचे सक्रिय कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी RSS साठी काम केल्याचा आरोप झाल्यानंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना जाहीरपणे फटकारले होते. “एकतर इकडे राहा, नाही तर तिकडे जा,” असं जाहीर बैठकीत राज ठाकरे यांनी परदेशींना सुनावल्याची चर्चा होती.

आज मात्र त्याच पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचारात काँग्रेस आणि RSS चा एकत्र उल्लेख होतो, हे विरोधाभासी चित्र असल्याची टीका होत आहे. “तेव्हा पिट्या भाईंनी RSS साठी काम केलं म्हणून त्यांना पक्षाबाहेर काढण्यात आलं, मग आज मतांसाठी RSS चा संदर्भ घेणं योग्य कसं?” असा सवाल अनेक राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत.

मनसेची भूमिका नेहमीच स्वतंत्र, आक्रमक आणि कोणत्याही राष्ट्रीय पक्षांपासून अलिप्त राहण्याची राहिली आहे. मात्र निवडणुकीच्या राजकारणात ही भूमिका सैल होत आहे का, की हा केवळ स्थानिक प्रचाराचा भाग आहे, यावर चर्चा रंगली आहे. राम बोरकर यांच्या वक्तव्यावर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतं, आणि या मुद्द्यावर मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Newsnetwork360Marathi