सरकारी शाळांसाठी CJP मैदानात; १५ ऑगस्टपासून अभिजीत दिपकेंची नवी मोहीम

अभिजीत दिपके यांनी १५ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील सरकारी शाळांसाठी CJPची विशेष मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. गावातील शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

abhijit dipke

Ai Generated

पुणे : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) अभिजीत दिपके यांनी सरकारी शाळांच्या प्रश्नावरून नवी मोहीम जाहीर केली आहे. येत्या १५ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील सरकारी शाळांवर CJPकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही ग्रामीण भागातील सरकारी शाळांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचा दावा अभिजीत दिपके यांनी केला आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, इमारतींची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

या पार्श्वभूमीवर गावातील सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दिपके यांनी केले आहे. आपल्या गावातील शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत CJP ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधणार असून, शाळांच्या मूलभूत सुविधांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


Inline Article Ad 728x90