Sukanya PeraneMPSC गट-क परीक्षेसाठी मेगाभरतीची शक्यता! 16 हजारांवर पदसंख्या नेण्याची समितीची शिफारस
MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील पदसंख्या 16 हजारांहून अधिक करण्याची आणि सर्व भरती परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची एकवेळची सवलत देण्याची शिफारस उच्चस्तरीय समितीने केली आहे. तसेच पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आणि परीक्षा प्रक्रियेत कडक सुरक्षा उपाय लागू करण्याच्या महत्त्वपूर्ण शिफारशी शासनाला सादर करण्यात आल्या आहेत.
















