रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यातील एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'शक्तिमान' आणि 'महाभारत' मालिकेतील भीष्म पितामह यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील सीतेच्या युद्धाच्या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी ॲना लेझनेवा (Anna Lezhneva) यांनी १३ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (९ नोव्हेंबर २०२६) दोघांनी एकत्रित निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या चित्रपट पाहण्याचा प्लॅन करताय? तर यंदा OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मोठी मेजवानी उपलब्ध झाली आहे. मर्डर मिस्ट्री, क्राइम थ्रिलर, हॉरर आणि रोमान्स अशा वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. Netflix, Amazon Prime Video, JioHotstar, SonyLIV आणि ZEE5 यांसारख्या प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय पाहायचं, असा प्रश्न पडला असेल, तर हे पाच चित्रपट तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.
दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. पण,यावेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळालं. याबाबतच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत फटाक्यांच्या अतिरेकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलात गाजत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी माता सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत झळकत आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावर्षीची दिवाळी मराठवाडा, सोलापूर आणि राजगड-तोरणा भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ असताना माणुसकीची चळवळ घराघरात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी 'फुलवारा' या लावणीप्रधान मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी टीझर शेअर करत रवी जाधव आणि मेघना जाधव यांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, कलाकारांचे चेहरे गुलदस्त्यात ठेवणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता असून, 'फुलवारा' 14 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खान अडचणीत आला होता. अमेरिकेचे नागरिकत्व आणि OCI कार्डधारक असल्याने त्याला 7 डिसेंबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने नोटीसवरील स्थगिती कायम ठेवत अभिनेत्याला मोठा दिलासा दिला आहे. मात्र, आंदोलनातील सहभागावरून न्यायालयाने त्याला चांगलेच सुनावले असून भविष्यात अशा आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याचे हमीपत्र आणि बिनशर्त माफी मागण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
मराठी रंगभूमीवरील चर्चेत असलेल्या 'आमने सामने' नाटकाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव यांना नाटकातून काढल्याच्या आरोपांवर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही कलाकारांना अशा प्रकारे नाटकातून काढणं अन्यायकारक असल्याचं म्हणत त्यांनी निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांना कलाकारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. ‘दशावतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी चित्रपटातील जंगलतोडीवर भाष्य करणारा व्हिडिओ शेअर करत चिंता व्यक्त केली. अभिनेता आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही सह्याद्रीच्या नैसर्गिक संपत्तीच्या संरक्षणाची भूमिका मांडली आहे.
अभिनेता इमरान खानला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारकडून भारत सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर इमरान खानने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून, त्याच्याविरोधात तोपर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑगस्ट क्रांती मैदानातील आंदोलनाशी संबंधित हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घ्या.
मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका स्टारकिडची एन्ट्री होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ शिंदे ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात वडील सयाजी शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधीही त्याला मिळाली आहे. सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट मराठीसह हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘CID’ आणि ‘आहट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक बृजेंद्र पाल सिंह (बी. पी. सिंह) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमित बहल आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ललित प्रभाकर आणि राजकुमार राव यांच्या ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट झाली आहे. सोमवारी चित्रपटाने भारतात सुमारे 2 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. दुसरीकडे, आदिनाथ कोठारेच्या ‘नयी नवेली’ने चौथ्या दिवशी 2.50 कोटी रुपयांची कमाई केल्याची आकडेवारी समोर आली असून, दोन्ही चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसची स्पर्धा रंगली आहे.
‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतर राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या आगामी बायोपिकबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. केवळ यशोगाथा नव्हे, तर आयुष्यातील चढ-उतार, अपयश, चुका, संघर्ष आणि नातेसंबंध उलगडणारी कथा त्यांना अधिक आकर्षित करते. मात्र, संबंधित व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट पैलूंवर प्रामाणिकपणे बोलण्याची तयारी दाखवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेवर कांदेपोह्यांच्या कार्यक्रमासाठी घरी बोलावून पाहुणचार न केल्याचा आरोप करत व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर अथर्व सुदामेने माफी मागतानाचा व्हिडीओ पोस्ट केला असून, ‘सुदाम्यांचे कांदे पोहे’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम 9 नोव्हेंबर रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कुशल बद्रिकेच्या व्हिडीओमुळे या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे
पुणे : शिवदर्शन मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने टिळक रोड येथे साकारण्यात आलेल्या ‘काली माता – आदिशक्ती’ या भव्य जिवंत देखाव्याला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकर्षक वेशभूषा, प्रभावी सादरीकरण आणि नेत्रदीपक प्रकाशयोजनेमुळे हा देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आदिशक्तीचे सामर्थ्य, महिलांचा सन्मान आणि स्त्रीशक्तीचा जागर यांचा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांच्या ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. तब्बल 33 चित्रपटांच्या शर्यतीत ‘गोंधळ’ने बाजी मारली आहे.
यशचा ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ 25 सप्टेंबर 2026 रोजी ZEE5 वर रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र OTT तारीख आणि प्लॅटफॉर्मबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘फूल और कांटे’मधून अजय देवगणला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. निधनापूर्वी पत्नी आणि अभिनेत्री अरुणा ईरानी यांच्याशी झालेला त्यांचा अखेरचा संवाद आता समोर आला असून, ‘जास्त अति करू नकोस’ हे त्यांचे शेवटचे शब्द ठरले.
अमेरिकेत झालेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेसृष्टी आणि जातव्यवस्थेवर परखड भाष्य केलं. हिंदी चित्रपटसृष्टीने अनेकदा जात लपवून अमीर-गरीब किंवा इतर कारणांच्या माध्यमातून कथा मांडल्या, असा दावा त्यांनी केला. “लोक आडनाव लपवलं तरी त्याची जात शोधून काढतात,” असं म्हणत मंजुळेंनी समाजातील जात ओळखण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केलं.
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि इतर कलाकारांसोबत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेही या चित्रपटात भरताच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील त्यांच्या छोट्याशा झलकने मराठी प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित केला असून, त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.
ZEE5 वरील ‘सतलुज’ चित्रपट अवघ्या दोन दिवसांत हटवण्यात आला. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले १२७ बदल न करता चित्रपट OTT वर प्रदर्शित झाल्याचा दावा असून, सरकारने IT कायद्याच्या कलम 69A अंतर्गत कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे OTT सेन्सॉरशिप आणि नव्या नियमांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची,हा चित्रपट २१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज ह्या चित्रपटाला अवघे ३९ दिवस झाले असून ३९ दिवसात १०० कोटींचा विक्रम केला आहे. सिटी प्राईड, कोथरूड येथे ३० जून २०२६ रोजी 'देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची' या चित्रपटाच्या १०० कोटींच्या विक्रमी यशानिमित्त संपूर्ण कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत जल्लोषात सेलिब्रेशन पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या या यशानिमित्त दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता देवेंद्र गायकवाड (दया दादा) आणि अभिनेत्री संस्कृती बाळगुडे यांनी चित्रपटाचा प्रवास, चित्रीकरणातील अनुभव आणि या अभूतपूर्व यशामागील कारणांबाबत मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.