‘गोल्ड’न चान्स! सोन्याचे दर पुन्हा घसरले
8 जुलै 2026 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली असून ग्राहकांसाठी खरेदीचा चांगला काळ निर्माण झाला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव किंचित कमी झाले असून चांदीही स्वस्त झाली आहे.
सोन्याच्या किमतींमध्ये 8 जुलै रोजी पुन्हा घसरण नोंदवण्यात आली असून, सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात एकूण 1,480 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,360 रुपयांची घट झाली आहे. आजही दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 10 रुपयांची किरकोळ घसरण नोंदली गेली. मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळुरूसारख्या प्रमुख शहरांमध्येही दर स्थिर-घसरणीच्या ट्रेंडमध्ये आहेत.
देशातील प्रमुख शहरांतील 8 जुलैचे दर असे आहेत: दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1,45,400 रुपये, 22 कॅरेट 1,33,290 रुपये आणि 18 कॅरेट 1,09,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेटचा दर 1,45,250 रुपये, 22 कॅरेटचा 1,33,140 रुपये आणि 18 कॅरेटचा 1,08,930 रुपये इतका नोंदवला गेला आहे. चेन्नईमध्ये सोन्याचे दर तुलनेने जास्त असून 24 कॅरेट सोने 1,46,170 रुपये, 22 कॅरेट 1,33,990 रुपये आणि 18 कॅरेट 1,11,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
चांदीच्या किमतींवरही औद्योगिक मागणी कमी झाल्याचा परिणाम दिसून आला आहे. दिल्लीमध्ये चांदीचा दर प्रति किलो 100 रुपयांनी कमी होऊन 2,44,800 रुपयांवर आला आहे. मुंबई आणि कोलकाता येथे चांदी 2,44,900 रुपये प्रति किलो, तर चेन्नईमध्ये 2,49,900 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुढील दिशा अमेरिका-इराण चर्चेचा निकाल, कच्च्या तेलाच्या किमती आणि फेडरल रिझर्व्हचे संकेत यावर ठरेल. अल्पावधीत सोनं-चांदी मर्यादित श्रेणीत राहू शकतात, मात्र भू-राजकीय तणाव कमी झाल्यास पुन्हा आधार मिळण्याची शक्यता आहे.