पुण्यात गणेशोत्सवात ‘लेझर’वर बंदी; ध्वनीप्रदूषणाचे नियम तोडल्यास थेट गुन्हा दाखल!

पुण्यात यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी कायम राहणार असून, डीजे आणि ध्वनीक्षेपकासाठी न्यायालयाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे. दरम्यान, वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून MPCB ला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

no laser

Ai generate

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने ध्वनीप्रदूषण आणि लेझर लाईटच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहरात लेझर लाईटवर बंदी कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव काळात डीजे, ध्वनीक्षेपक आणि मोठ्या आवाजातील संगीतामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचा दाखला दिला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच साजरा करावा लागेल. यासाठी गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे.

डीजे आणि ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

ध्वनीप्रदूषणाविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

दरम्यान, पुण्यातील ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत पोहोचला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे, ध्वनीप्रदूषण आणि लेझरच्या वापरावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.

Inline Article Ad 728x90