Shoaib Nadafकॅफेत ग्राहकांशी गैरवर्तन महागात पुण्यातील PSI संदीप कदम निलंबित
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांना कॅफेमध्ये ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागाने ही कारवाई केली.