Minaz Shaikhबंदुकीच्या धाकाने २३ वर्षीय तरुणीचे घरातून अपहरण; ७ तोळे सोने आणि ५ लाखांची रोकडही लंपास
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक गावात २ जुलै रोजी भरदिवसा २३ वर्षीय अक्षदा पवार हिचे पिस्तुलाचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले. मुख्य आरोपी कमरुद्दीन मुकीम शेख आणि त्याच्या दोन साथीदारांनी घरात घुसून तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. विरोध करणाऱ्या कुटुंबीयांना पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपींनी घरातील ५.०१ लाखांची रोकड आणि सुमारे ७ तोळ्यांचे सोन्याचे गंठण लुटून नेल्याचा आरोप आहे. यवत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा आणि अपहृत तरुणीचा शोध सुरू केला आहे.