Sakshi Megha Prabhuलोहगड हत्याकांड तपासाला नवे वळण; सिया गोयल आणि चेतन चौधरींच्या लाय डिटेक्टर चाचणीची तयारी
बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी मागण्याचा विचार तपास यंत्रणा करत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आरोपींच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगती, घटनाक्रमातील संदिग्ध मुद्दे आणि अद्याप न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरू शकते, असे पोलिसांचे मत आहे. त्यामुळे प्रकरणाचा उलगडा अधिक स्पष्टपणे होण्यासाठी तपास यंत्रणा या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.