Sakshi Megha Prabhuमुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण; रेड अलर्टमुळे जनजीवन ठप्प
मुंबईसह महानगर प्रदेशात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराची वाहतूक, रेल्वे सेवा आणि दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी तात्काळ रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 ते 48 तास अतिशय संवेदनशील ठरू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण किनारपट्टी, गोवा आणि दक्षिण गुजरातमध्येही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.