minaz Shaikhहे पाठ्यपुस्तक आहे की बॉलिवूडची गाण्यांची वही? 'निंबूडा' प्रकरणाने ओडिशात खळबळ
भुवनेश्वर : ऐश्वर्या राय बच्चन ही केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चाहत्यांची आवडती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'जोधा अकबर' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. विशेषतः 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'निंबूडा-निंबूडा' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. मात्र, याच लोकप्रिय बॉलिवूड गाण्यामुळे आता ओडिशा सरकारच्या शालेय शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे.