Minaz Shaikhपुण्यात पुन्हा 'बिश्नोई गँग'ची दहशत! नामांकित व्यावसायिकाकडे २ कोटींची खंडणी
पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा 'बिश्नोई गँग'च्या नावाने खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तमनगर परिसरातील एका नामांकित व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीने इंटरनेट कॉल करून तब्बल **२ कोटी रुपयांची खंडणी* मागितली. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात अशाच प्रकारची समोर आलेली ही तिसरी घटना असल्याने शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.