Sakshi Megha Prabhuकोरेगाव पार्कमध्ये दुर्गंधीचा कहर, रस्ता तात्पुरता बंद
कोरेगाव पार्क वाहतूक विभागातील जहांगीर चौक आणि मंगलदास चौक दरम्यान गुरुवारी सांडपाणी पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी पसरले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला असून पुणे महापालिकेकडून घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पुणे ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने मार्ग घसरडा आणि धोकादायक बनला आहे. त्यामुळे जेथे वाहतूक सुरू ठेवणे सुरक्षित नाही, त्या भागात प्रवेश बंद करण्यात आला आहे.