Sukanya Peraneचक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत; आंध्र प्रदेशात 3 मृत्यू, अनेक रेल्वेगाड्या आणि विमानांची उड्डाणे रद्द
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहत आहेत. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील 16 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेगाड्या आणि विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून देशातील नऊ राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.