Sakshi Megha Prabhuपुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा; पवना धरण परिसरात दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, NDRF, PDRF आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
