Sukanya Perane'उत्तर द्यायचा कंटाळा येत असेल तर राजीनामा द्या'; अभिजीत दिपकेंचा अशोक उईकेंना इशारा, पुढील आंदोलन थेट मंत्र्यांविरोधात?
आदिवासी आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरून अभिजीत दिपके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांची पाहणी करण्याच्या उईकेंच्या आव्हानाला दिपकेंनी प्रत्युत्तर दिले असून, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविल्या नाहीत तर मंत्र्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.