Sakshi Megha Prabhuमंकी हिल येथे दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम; 16 गाड्या रद्द, 6 गाड्यांचे मार्ग बदलले
मुंबई विभागातील मंकी हिल (Monkey Hill) घाट सेक्शनमध्ये दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने १६ रेल्वे गाड्या रद्द केल्या असून ६ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याशिवाय काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट आणि रीशेड्यूल करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी रेल्वेची ताजी माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.