Madhura Manbhekarलष्करी जवानावर पत्नीच्या हत्येचा आरोप; सात महिन्यांची गर्भवती पत्नी ठार, वाशिममध्ये खळबळ
वाशिम जिल्ह्यात सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची कथितरित्या गळा आवळून हत्या केल्याच्या आरोपावरून २८ वर्षीय लष्करी जवान ज्ञानेश्वर मदने याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर जवानासह त्याच्या आई-वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्येमागील नेमके कारण आणि कुटुंबीयांची भूमिका याचा पोलीस तपास करत आहेत.