SAKSHI MEGHA PRABHUकेतन अग्रवाल हत्या प्रकरण : लोहगडावर 'क्राईम सीन रिक्रिएशन'; तपास अंतिम टप्प्यात
पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलत लोहगड किल्ल्यावर 'क्राईम सीन रिक्रिएशन' (घटनास्थळाचे प्रात्यक्षिक) केले. तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, गुन्हा नेमका कसा घडला आणि आरोपींच्या हालचाली काय होत्या, याची खातरजमा करण्यासाठी मुख्य आरोपी सिया गोयल हिला रविवारी कडक पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी नेण्यात आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. तपासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सकाळी ६ ते ११ या वेळेत पर्यटकांना लोहगड किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती.