Sukanya Peraneखासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लॉजमध्ये तरुणीची आत्महत्या; डोंबिवली हादरली!
डोंबिवलीतील गोळवली परिसरातील लॉजमध्ये २३ वर्षीय फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यानंतर खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुमित खवळे याला अटक केली आहे.