Madhura Manbhekarसोया चाप खाण्यापूर्वी ही बातमी वाचा! गाझियाबादमध्ये 200 किलो सोया चाप नष्ट
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अन्न सुरक्षा विभागाने सोया चाप तयार करणाऱ्या एका कारखान्यावर धाड टाकली. तपासणीत अत्यंत अस्वच्छ वातावरणात सोया चाप तयार केला जात असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान 200 किलो संशयित सोया चाप नष्ट करण्यात आला, तर भेसळ किंवा घातक रसायनांची तपासणी करण्यासाठी तीन नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा विभागाने अशा कारखान्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.