Sakshi Megha Prabhuमर्चंट नेव्हीच्या जहाजावर हल्ला; पुण्याचा अभियंता हेरंब करमरकर ठार
होमुर्झच्या सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील मर्चंट नेव्हीचे अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. ते एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी जहाजावर कार्यरत होते. हल्ल्यानंतर २४ पैकी २३ कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मृत्यूपूर्वी काही मिनिटे आधी त्यांनी कुटुंबीयांशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता.