SAKSHI MEGHA PRABHUसाखरपुडा केतनसोबत; हनिमून चेतनसोबत? इतरांशीही संबंध? विशाल अग्रवाल यांच्या दाव्याने खळबळ
लोणावळा : लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन अगरवाल प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक पैलू समोर येत असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात आता पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तपासादरम्यान सिया गोयल आणि केतन अगरवाल यांच्या नातेसंबंधांबाबतही काही महत्त्वाची माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.