साखरपुडा केतनसोबत; हनिमून चेतनसोबत? इतरांशीही संबंध? विशाल अग्रवाल यांच्या दाव्याने खळबळ

लोणावळा : लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झालेल्या केतन अगरवाल प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक पैलू समोर येत असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात आता पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तपासादरम्यान सिया गोयल आणि केतन अगरवाल यांच्या नातेसंबंधांबाबतही काही महत्त्वाची माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.

KETAN AGRAWAL CASESAKSHI MEGHA PRABHU

अपघात नव्हे तर रचलेला कट?


लोहगड येथे झालेल्या प्रकाराबद्दल आणखीन काही गोष्टी पोलीस तपासातून समोर आलेल्या आहेत. ज्यामध्ये १८ जून रोजी घडलेली घटना हा केवळ अपघात नसून हा एक रचलेला कट असल्याचे निश्चित झाले आहे. ह्यामध्ये सिया गोयल व चेतन चौधरी ह्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. लोहगड गडावरून पाय घसरून त्याचा मृत्यू झाला असे वाटत होते, पण सिया आणि तिच्या प्रियकराने मिळून हा डाव रचलेला समोर येत आहे. दोघांनी मिळून त्याला कड्यावरून खाली ढकलून त्याची हत्या केल्याचे समजते आहे.


सिया-चेतन यांचे प्रेमप्रकरण आणि कॉल डिटेल्समधील खुलासे


सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरी ह्यांचे वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरु होते. केतन सोबत लग्नाची बोलणी सुरु असताना देखील त्यांचे बोलणं सुरु होते. पोलिसांनी केलेल्या तपासात काही कॉल डिटेल्स समोर येताना दिसत आहेत ज्यामध्ये सिया आणि चेतन चौधरी ह्यांचे दिवसभरात १२ ते १५ कॉल्स रोज सुरु असल्याचे समोर आले आहे. हे कॉल्स एकूण १४,२८0 मिनिट्स चे असून त्याचा रेकॉर्ड पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. केवळ सहा महिन्या मध्ये तब्बल २00४ वेळा त्यांचे कॉल्स झाल्याचे समजते आहे. चेतन चौधरी व सिया गोयल हे एकमेकांना वारंवार भेटत होते, लग्नाआधीच एकमेकांसोबत हनिमून ला गेल्याचे देखील उघड झाले आहे.


विशाल अग्रवाल यांचे आरोप; कुटुंबीयांवर गंभीर प्रश्न


केतन अग्रवाल चे वडील विशाल अग्रवाल ह्यांनी ह्या प्रकरणाला वाचा फोडत सिया गोयलच्या परिवारावर थेट आरोप केले आहे. सियाचे हे वागणे तिच्या घरच्यांना आधी पासून माहिती होते तरीदेखील लग्नानंतर ती सुधारेल असा विचार करून आम्ही लग्नाला होकार दिला. "फक्त चेतन चौधरी नाही तर आणखीन मुलांसोबत तिचे संबंध होते ", असे वक्तव्य विशाल अग्रवाल यांनी केले आहे. "स्वतःच्या मुलीचे सर्व गुण माहिती असताना देखील आम्हाला कळून नाही दिले, आमच्या पासून सर्व गोष्टी लपवून ठेवल्या." "गोष्टी वेळेअभावी उघड झाल्या असत्या तर आज आमचा मुलगा आमच्या सोबत असला असता", अशी खंत विशाल अग्रवाल ह्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ह्या प्रकरणाचा पुढील शोध पोलीस निरीक्षक घेत असून तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90