Sakshi Megha Prabhuनोएड्यात एकाकी वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; तीन दिवस फ्लॅटमध्येच पडून होता मृतदेह
उत्तर प्रदेशातील नोएडाच्या अम्रपाली सिलिकॉन सिटी सोसायटीमध्ये ६८ वर्षीय राजीव अरोरा यांचा फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर तीन दिवस त्यांचा मृतदेह घरातच पडून होता. दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपासात ते एकटे राहत होते आणि आर्थिक तणावात असल्याची माहिती समोर आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.