Sakshi Megha Prabhuपतीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; तब्बल 9 वर्षांनंतर पत्नीला जन्मठेप
पंजाबमधील मोहाली येथे २०१७ मध्ये घडलेल्या उद्योगपती एकम सिंग धिल्लों हत्याप्रकरणी तब्बल नऊ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नी सीरत कौरला पतीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुरावे नष्ट करणे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे या आरोपांमध्येही तिला स्वतंत्र शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणात दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलाची साक्ष निर्णायक ठरली.