Sukanya Peraneकुकरच्या 10 शिट्ट्यांनंतरही वाटाणा शिजेना, आता रायगडमध्ये अमृत आहारावर गंभीर आरोप; तक्रार करणाऱ्या मदतनीसाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?
रायगडच्या कर्जत तालुक्यातील वरची भागुची वाडी अंगणवाडीत चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या अमृत आहाराच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सडलेली डाळ, कीड लागलेले अन्न, खराब केळी आणि साखरेत उंदराची विष्ठा आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अनियमिततेबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस उर्मिला पारधी यांनी मानसिक छळाचा आरोप करत राजीनामा दिला आहे.