लग्नाचे आश्वासन, 10 लाखांची फसवणूक; मंगेश जगतापांवर गंभीर आरोप

बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, शारीरिक संबंध आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Mangesh Jagtap Marriage Promise 10 Lakh Fraud Allegation Image

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, वारंवार शारीरिक संबंध ठेवणे आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बारामतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार भाग्यश्री धायगुडे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथे उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, हा गुन्हा सुरुवातीला पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळ माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तपासासाठी तो तेथे वर्ग करण्यात आला.

तक्रारीनुसार, 2012 ते 2026 या कालावधीत मंगेश जगताप यांनी लग्नाचे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच, 8 ते 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास माळेगाव पोलीस करत असून आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

14 वर्षांचे प्रेमसंबंध

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, दोघांचे कॉलेजपासून जवळपास 14 वर्षांचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आश्वासन देत अनेक वर्षे संबंध कायम ठेवण्यात आले. मात्र, नंतर मंगेश जगताप यांनी दुसरे लग्न केल्याचे समोर आले.

याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगत काही कागदपत्रे दाखवली. मात्र, ती कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

महिलेचे आणखी आरोप

तक्रारदार महिलेने आरोपीच्या कुटुंबीयांवर आणि काही सहकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. महाबळेश्वर येथे लग्नासाठी रिसॉर्ट बुक करण्यात आले होते, लग्नाची तारीखही निश्चित झाली होती आणि त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90