Sukanya Peraneगुन्हा दाखल होताच मोठा निर्णय; भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी दिला सर्व पदांचा राजीनामा, पत्रात केला ‘हा’ दावा
कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पवार यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, आपल्याविरोधातील आरोप खोटे असल्याचा आणि बदनामीचे षडयंत्र रचल्याचा दावा त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.