चेहरा लपवला, पण 'चाल' कशी लपवणार? लोहगड मर्डर केसमध्ये पुणे पोलिसांचे 'गॅट ॲनालिसिस' चक्रव्यूह!
पुणे: १८ जून २०२६ रोजी लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर एक खळबळजनक घटना घडली. २५ वर्षांचा तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा ट्रेकिंगदरम्यान ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. सुरुवातीला हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात वाटत होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून, अत्यंत थंड डोक्याने रचलेला एक क्रूर कट असल्याचे समोर आले आहे. केतन अग्रवाल यांच्या हत्येचा हा कट त्यांची फियान्से सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून रचला होता. पोलिसांनी संशय बळावल्यानंतर घटनास्थळावर जाऊन डमी पुतळा दरीत ढकलून 'क्राइम सीन री-क्रिएशन' देखील केले. परंतु, या संपूर्ण केसमध्ये आरोपी चेतन चौधरीची ओळख न्यायालयात पक्की सिद्ध करण्यासाठी पुणे पोलिसांनी एका अत्याधुनिक विज्ञानाचा वापर केला आहे, ज्याचे नाव आहे 'गॅट ॲनालिसिस' (Gait Analysis).
Sakshi Megha Prabhuनेमकी काय आहे लोहगड मर्डर केस?
मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी केतनला कायमचे रस्त्यातून हटवण्यासाठी लोहगड किल्ल्यावरील धोकादायक कड्याची निवड केली होती. गुन्ह्याच्या दिवशी कडक उन्हाळा म्हणजेच ३३ डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही, चेतन चौधरीने अंगात जाड हुडी (Hoodie) घालून आणि चेहरा लपवून केतनचा पाठलाग केला होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती कैद झाली होती, परंतु हुडी आणि कपड्यांमुळे पोलिसांना त्याचा चेहरा स्पष्ट ओळखण्यात अडचण येत होती. नेमकी याच टप्प्यावर पुणे पोलिसांना 'गॅट ॲनालिसिस' या तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली.
गॅट ॲनालिसिस' म्हणजे नक्की काय? (What is Gait Analysis?)'
सोप्या भाषेत सांगायचे तर, गॅट ॲनालिसिस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीची केली जाणारी वैज्ञानिक किंवा फॉरेन्सिक तपासणी.
जगात प्रत्येक माणसाच्या हाता-पायांची रचना, हाडांची ठेवण आणि चालण्याची पद्धत (Walking Style) ही फिंगरप्रिंट्ससारखीच पूर्णपणे वेगळी आणि अद्वितीय असते. गुन्हेगार आपला चेहरा लपवू शकतो, वेशांतर करू शकतो, पण नैसर्गिकरित्या चालण्याची त्याची पद्धत तो बदलू शकत नाही. याच सिद्धांतावर हे तंत्रज्ञान काम करते.

फॉरेन्सिक तपास कसा केला जातोय?
व्हिडिओंची तुलना: गुन्ह्याच्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हुडी घातलेल्या संशयिताचा व्हिडिओ आणि सध्या अटकेत असलेल्या चेतन चौधरीच्या चालण्याचा पोलिसांसमोर घेतलेला नवीन व्हिडिओ, या दोन्हीची सायबर लॅबमध्ये तुलना केली जात आहे.
हे निकष तपासले जाणार: गॅट ॲनालिसिस दरम्यान आरोपीच्या शरीराची लयबद्धता (Body Rhythm), दोन पावलांमधील अचूक अंतर, चालताना होणारी हाता-पायांची हालचाल आणि एकूण पेहराव या सर्व तांत्रिक गोष्टी मॅच केल्या जात आहेत.हा वैज्ञानिक पुरावा न्यायालयात सादर करून आरोपीनेच हा गुन्हा केला आहे, हे पोलिसांतर्फे सिद्ध केले जाईल.
तपासाला योग्य दिशा मिळणार का?
फॉरेन्सिक तपासातील 'गॅट ॲनालिसिस'चा हा आधुनिक वापर या हाय-प्रोफाइल केतन अग्रवाल मर्डर केसला कोणती योग्य दिशा देणार? आरोपींना या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षा होणार का? याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.