Mumbai Firecracker Ban: मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी! आगीच्या वाढत्या घटनांनंतर महापालिकेचा मोठा निर्णय

दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढत असल्याने मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ९ नोव्हेंबरपासून लागू झाली असून, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहणार आहे. दिवाळीच्या काळात मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. मात्र, या फटाक्यांमुळे काही ठिकाणी भीषण आगी लागल्याच्या घटना घडल्या. रविवारी (८ नोव्हेंबर) मुंबई अग्निशमन दलाकडे आगीच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली. यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.

Mumbai Firecracker Ban

Mumbai : दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढत असल्याने मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ९ नोव्हेंबरपासून लागू झाली असून, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहणार आहे. दिवाळीच्या काळात मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. मात्र, या फटाक्यांमुळे काही ठिकाणी भीषण आगी लागल्याच्या घटना घडल्या. रविवारी (८ नोव्हेंबर) मुंबई अग्निशमन दलाकडे आगीच्या तब्बल १४२ घटनांची नोंद झाली. यापैकी १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत.

कोणत्या फटाक्यांवर बंदी?

मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार, हवेत उडणारे रॉकेट आणि त्यासारख्या फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित नसून खासगी जागांनाही लागू असणार आहे. निवासी इमारती, गच्ची, बाल्कनी, अंगण, पार्किंग परिसर, झोपडपट्ट्या आणि इतर ठिकाणीही असे फटाके फोडता येणार नाहीत. मात्र, सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आलेली नाही. इतर फटाक्यांच्या वापरासाठी यापूर्वीचे नियम आणि न्यायालयीन आदेश लागू राहतील.

मुंबईत आगीच्या घटना वाढण्यामागचं कारण काय?

मुंबईत उंच इमारती, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका अधिक असतो. रॉकेटसारखे फटाके हवेत उडाल्यानंतर त्यांचे जळते अवशेष इमारतींच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा ज्वलनशील वस्तूंवर पडू शकतात. त्यामुळे आगीच्या घटना घडण्याची शक्यता वाढते. नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नियम मोडल्यास कारवाई होणार

मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुंबई पोलीस, महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलावर सोपवण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. कायद्यांतर्गत आदेशाचे पालन करण्यास विनाकारण नकार दिल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

दरम्यान, दिवाळीच्या उत्साहात नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसेच फटाके फोडताना प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Inline Article Ad 728x90