Vaishnavi Gholapमेकअप करताना चुकूनही करू नका 'या' 5 चुका! नाहीतर चेहऱ्याचं सौंदर्य बिघडू शकतं
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी अनेक जण मेकअपचा वापर करतात. कॉलेज असो, ऑफिस असो किंवा एखादा खास कार्यक्रम. मेकअप हा अनेक महिलांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, अनेकदा मेकअप करताना केलेल्या काही छोट्या चुका तुमचा लूक खराब करू शकतात. चुकीच्या पद्धतीने मेकअप केल्यास त्वचा कोरडी दिसणे, मेकअप पॅची होणे किंवा चेहरा तेलकट दिसणे अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेकअप करताना या पाच चुका टाळणे महत्त्वाचे आहे.