New OTT Releases : ओटीटीवर दिवाळी धमाका! मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन् रोमान्सची मेजवानी; घरबसल्या पाहा 'हे' ५ चित्रपट
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या चित्रपट पाहण्याचा प्लॅन करताय? तर यंदा OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मोठी मेजवानी उपलब्ध झाली आहे. मर्डर मिस्ट्री, क्राइम थ्रिलर, हॉरर आणि रोमान्स अशा वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. Netflix, Amazon Prime Video, JioHotstar, SonyLIV आणि ZEE5 यांसारख्या प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय पाहायचं, असा प्रश्न पडला असेल, तर हे पाच चित्रपट तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.

OTT Releases : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या चित्रपट पाहण्याचा प्लॅन करताय? तर यंदा OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मोठी मेजवानी उपलब्ध झाली आहे. मर्डर मिस्ट्री, क्राइम थ्रिलर, हॉरर आणि रोमान्स अशा वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. Netflix, Amazon Prime Video, JioHotstar, SonyLIV आणि ZEE5 यांसारख्या प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट दाखल झाले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय पाहायचं, असा प्रश्न पडला असेल, तर हे पाच चित्रपट तुमच्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात.
१. हैवान (Haiwaan)
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'हैवान' हा रहस्य आणि थराराने भरलेला चित्रपट आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एका इमारतीत काम करणारा दृष्टिहीन लिफ्ट ऑपरेटर खुनाच्या प्रकरणात मुख्य संशयित ठरतो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याला खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यावा लागतो. मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खास ठरू शकतो. बॉक्स ऑफिसनंतर हा चित्रपट ६ नोव्हेंबरला SonyLIV वर रिलीज झाला आहे.
२. द व्वान – फोर्स ऑफ द फॉरेस्ट (The Vvaan)
सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द व्वान – फोर्स ऑफ द फॉरेस्ट' हा रहस्य आणि लोककथांवर आधारित थ्रिलर चित्रपट आहे. जंगलातील जुन्या दंतकथा, रहस्यमय मंदिरं आणि अनपेक्षित घटनांभोवती या चित्रपटाची कथा फिरते. रहस्य आणि भीतीदायक वातावरण असलेल्या कथा आवडणाऱ्यांसाठी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे. Amazon Prime Video वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
३. आय अॅम गेम (I'm Game)
दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानचा 'आय अॅम गेम' हा मल्याळम अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. क्रिकेट, बेटिंग आणि गुंतागुंतीच्या घटनांमुळे एका तरुणाचं आयुष्य कसं बदलतं, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये अॅक्शनसोबत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळतात. हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करूनही उपलब्ध करण्यात आला आहे. हा चित्रपट JioHotstar वर उपलब्ध आहे.
४. दिलवाली दिवाली (Dilwali Diwali)
दिवाळीच्या वातावरणात कुटुंबासोबत हलकाफुलका चित्रपट पाहायचा असेल, तर 'दिलवाली दिवाली' हा एक पर्याय आहे. या चित्रपटात एका कुटुंबातील नातेसंबंध, भावना आणि दिवाळीच्या निमित्ताने घडणाऱ्या घटनांची कथा पाहायला मिळते. अनेक वर्षांनी घरी परतलेल्या तरुणाच्या निर्णयामुळे कुटुंबात काही मतभेद निर्माण होतात. त्यातून पुढे घडणाऱ्या प्रसंगांमधून नात्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. या चित्रपटात मनोज पाहवा, नीलू कोहली आणि मिहिर आहुजा यांच्या भूमिका आहेत. Netflixवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.
५. नूरू कोडी वानविल (Nooru Kodi Vaanavil)
रोमान्स आणि भावनिक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'नूरू कोडी वानविल' हा तमिळ चित्रपट उपलब्ध झाला आहे. अभिनेता हरीश कल्याण आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक अपेक्षांमधून निर्माण होणाऱ्या अडचणींची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सासी यांनी केलं आहे. रोमँटिक चित्रपट पाहायला आवडत असतील, तर हा पर्याय निवडू शकता. ZEE5 हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.