Ramyana Box Office Collection : दिवाळीत ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अवघ्या चार दिवसांत ५०० कोटींच्या जवळ कमाई

रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलात गाजत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी माता सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत झळकत आहे.

Ramayana Box Office Collection

Ramyana Box Office Collection : रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलात गाजत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात जवळपास ५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या, साई पल्लवी माता सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत झळकत आहे.

पहिल्या चार दिवसांत किती कमाई?

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग वेबसाइट Sacnilk च्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने पहिल्याच दिवशी भारतात ६४.८५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४८.०५ कोटी रुपयांची कमाई झाली. त्यानंतर शनिवारी कमाईत मोठी वाढ झाली आणि चित्रपटाने ६९.८० कोटी रुपये कमावले. रविवारी (८ नोव्हेंबर) दिवाळीच्या दिवशी चित्रपटाने ५६.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या चार दिवसांत भारतातील एकूण निव्वळ कमाई २३८.८५ कोटी रुपयांवर पोहोचली.

जगभरातील कमाई ५०० कोटींच्या उंबरठ्यावर

‘रामायण’ची जादू केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही पाहायला मिळत आहे. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई २८५.२० कोटी रुपये झाली आहे. तर परदेशातून २१४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. अशा प्रकारे चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात ४९९.२० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे ५०० कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यापासून चित्रपट अवघ्या काही अंतरावर आहे.

दिवाळीच्या वीकेंडचा चित्रपटाला मोठा फायदा झाला आहे. मात्र, सुट्ट्या संपल्यानंतरही चित्रपटाची कमाई अशीच सुरू राहणार का, याकडे चित्रपटसृष्टीचं लक्ष आहे.‘रामायण’ने पहिल्या चार दिवसांत दमदार सुरुवात केली असली, तरी पुढील काही दिवसांतील कमाई महत्त्वाची ठरणार आहे. आता चित्रपट पहिल्या आठवड्यात किती कोटींचा टप्पा गाठतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


Inline Article Ad 728x90