Ruchira Jadhav : “ही शेवटची दिवाळी नाहीये…”; फटाक्यांच्या धुरामुळे रुचिरा जाधवची नाराजी, व्हिडीओ चर्चेत!
दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. पण,यावेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळालं. याबाबतच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत फटाक्यांच्या अतिरेकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Ruchira Jadhav : दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. पण,यावेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळालं. याबाबतच मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत फटाक्यांच्या अतिरेकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
रुचिराने शेअर केलेल्या व्हिडीओत तिच्या घराच्या परिसरात फटाक्यांचा धूर पसरल्याचं दिसत आहे. नेहमी स्पष्ट दिसणाऱ्या इमारती फटाक्यांच्या धुरामुळे दिसेनाशा झाल्याचं तिने सांगितलं. व्हिडीओमध्ये रुचिरा म्हणाली, "मला वाटलं नव्हतं की दिवाळीतील पहिली पोस्ट ही असेल. तुम्हाला हा फटाक्यांचा आवाज येतोय का ऐकू? हा जो इथला पार्ट आहे. मी कधीतरी दिवाळीनंतर दाखवेन. इथे सगळ्या बिल्डिंग्स आहेत आणि त्या स्पष्टपणे दिसतात अगदी पवईपर्यंत.पण आता मी बाहेर आले आणि बघितलं तर बापरे हे काय सुरूये .फटाके फोडले पाहिजेत. मी फटाक्यांच्या विरोधात नाहीये. फटाके फोडू नका असं म्हणणाऱ्यांमध्ये मी नाही. फोडा पण, हे जरा अती होतंय. ही आपली शेवटची दिवाळी नाहीये. प्लीज एवढं नका करू... सगळ्यांनी थोडं थांबा आणि पृथ्वीला श्वास घेऊ द्या".
रुचिराच्या या व्हिडीओमुळे दिवाळीतील फटाके आणि हवेच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि सूक्ष्म धूलिकणांमुळे हवेची गुणवत्ता खालावू शकते. रुचिरा जाधव ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली. विविध मालिकांमधील भूमिकांमुळे ती प्रेक्षकांच्या परिचयाची आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठीमध्येही ती दिसली होती. आता फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत केलेल्या आवाहनामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.