पुणेकरांसाठी मोठा दिलासा! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द; सर्व धरणे 100 टक्के भरली
पुणे शहरातील पाणीकपात अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती दिली असून खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत, तर टेमघर धरण 98 टक्के भरले आहे.
Ai Genereted
पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला धरणात मुसळधार पावसामुळे नदीपात्रात २४,२७७ ते २७,२७७ क्युसेक (Cusecs) वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे 100 टक्के भरली
पुणे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. विशेषतः धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढे भरून वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तर टेमघर धरण 98 टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणेकरांना मोठा दिलासा
पाणीसाठ्यात झालेली मोठी वाढ आणि धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुणे शहरातील नागरिकांना आता नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.