सरकारसोबत सहमती; 26 दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडले उपोषण

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सरकार आणि वांगचुक यांच्यात सहमती झाली. सरकारने पुढील चर्चेचे आश्वासन दिले असून, वांगचुक यांनी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आणि संवादातून लडाखच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन केले.

Sonam Wangchuk

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सरकार आणि वांगचुक यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली आणि सरकारचे आश्वासनपत्र दिले. त्यानंतर त्यांनी उपोषण संपवल्याची घोषणा केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह, जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात सुमारे चार तास चर्चा झाली. या बैठकीत वांगचुक यांच्या मागण्या, त्यांची प्रकृती आणि पुढील तोडगा यावर चर्चा करण्यात आली. सरकारने संवादातून प्रश्न सोडवण्याची तयारी दाखवली.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नीशीही फोनवर चर्चा केली. सरकार सर्व मागण्यांवर गंभीरपणे विचार करत असून, संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही केली.

सरकारने CJP प्रतिनिधीमंडळासोबत पुढील चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच DoPT अंतर्गत तयार केलेले नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

उपोषण संपवल्यानंतर सोनम वांगचुक यांनी लवकरच लडाखला परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्याआधी ते आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि समर्थकांची भेट घेणार आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे, सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

लडाखच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संवादाचा मार्गच योग्य असून, त्यासाठी आपण पुढेही प्रयत्न करत राहू, असेही सोनम वांगचुक यांनी सांगितले.

Inline Article Ad 728x90