Sukanya Perane4 वर्षांचा विश्वास अन् एका सकाळी विश्वासघात! मालकाचे हात-पाय बांधून 50 लाखांचे दागिने, 4 लाखांची रोकड लंपास
अकोला शहरातील नया जीन परिसरात भरदिवसा धक्कादायक दरोड्याची घटना समोर आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून कामावर असलेल्या हमालानेच दोन साथीदारांच्या मदतीने मालकाच्या घरात दरोडा टाकल्याचा आरोप आहे. मालकाचे हात-पाय बांधून आरोपींनी तब्बल 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर रामदास पेठ पोलिसांनी तपास सुरू केला असून, हा दरोडा पूर्वनियोजित होता का, याचा शोध घेतला जात आहे.