Pune Diwali Shopping: दिवाळी शॉपिंगसाठी पुण्यातील 5 बेस्ट मार्केट्स! स्वस्तात मस्त खरेदी कुठे कराल?

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण! दिवाळी जवळ आली की घराघरांत साफसफाई, सजावट आणि खरेदीची लगबग सुरू होते. नवीन कपडे, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, दागिने आणि घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. पण, वाढत्या महागाईमुळे दिवाळीची खरेदी करताना बजेटचाही विचार करावा लागतो. पुण्यात अशी काही प्रसिद्ध मार्केट्स आहेत, जिथे कपड्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्व काही बजेटमध्ये खरेदी करता येतं. चला तर मग, जाणून घेऊया दिवाळी शॉपिंगसाठी पुण्यातील टॉप ५ मार्केट्स!

Pune Diwali Shopping

Pune Diwali Shopping: दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण! दिवाळी जवळ आली की घराघरांत साफसफाई, सजावट आणि खरेदीची लगबग सुरू होते. नवीन कपडे, आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, रांगोळी, दागिने आणि घर सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. पण, वाढत्या महागाईमुळे दिवाळीची खरेदी करताना बजेटचाही विचार करावा लागतो. पुण्यात अशी काही प्रसिद्ध मार्केट्स आहेत, जिथे कपड्यांपासून ते सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्व काही बजेटमध्ये खरेदी करता येतं. चला तर मग, जाणून घेऊया दिवाळी शॉपिंगसाठी पुण्यातील टॉप 5 मार्केट्स!

1. लक्ष्मी रोड

पुण्यातील खरेदीचा विषय निघाला की लक्ष्मी रोडचं नाव आवर्जून घेतलं जातं. शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या व्यापारी भागांपैकी एक असलेले लक्ष्मी रोड. दिवाळीच्या काळात मात्र या परिसरातील दुकानांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो.लक्ष्मी रोडवर पारंपरिक साड्या, पैठणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, कुर्ते, लहान मुलांचे कपडे आणि विविध प्रकारचे रेडिमेड कपडे खरेदी करता येतात. याशिवाय सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते फॅशन ज्वेलरीपर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. नवीन कपडे किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार असेल, तर या बाजारपेठेला तुम्ही भेट देऊ शकता.

2. तुळशीबाग

पुण्यातील तुळशीबाग ही महिलांच्या खरेदीसाठी विशेष लोकप्रिय असलेली बाजारपेठ आहे. येथे कपडे, बांगड्या, कानातले, गळ्यातील दागिने, सौंदर्यप्रसाधने, केसांच्या अ‍ॅक्सेसरीज आणि घरगुती वापराच्या अनेक वस्तू मिळतात. दिवाळीच्या काळात या परिसरात सजावटीच्या साहित्याचीही दुकाने पाहायला मिळतात. दिवाळीसाठी घर सजवायचं असेल, तर रंगीबेरंगी पणत्या, तोरणे, कृत्रिम फुलांच्या माळा, रांगोळी साहित्य, पूजेच्या थाळ्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंसाठी तुळशीबाग चांगला पर्याय आहे.

3.रविवार पेठ

दिवाळी म्हटलं की घराबाहेर लावलेले आकाशकंदील आणि रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई डोळ्यांसमोर येते. तुम्हाला जर आकर्षक विद्युत रोषणाई करायची असेल, तर पुण्यातील रविवार पेठ आणि बोहरी आळी परिसरातील बाजारपेठांना भेट देऊ शकता. या भागात विविध प्रकारचे LED लाइट्स, इलेक्ट्रिक माळा, सजावटीचे दिवे, आकाशकंदील आणि घर सजवण्यासाठी लागणारे साहित्य मिळते. दिवाळीच्या दिवसांत अनेक दुकानांमध्ये वेगवेगळ्या आकारांचे आणि डिझाइनचे आकाशकंदील पाहायला मिळतात.

4. फॅशन स्ट्रीट, कॅम्प

दिवाळीत पारंपरिक कपड्यांसोबतच ट्रेंडी फॅशनचे कपडे खरेदी करायचे असतील, तर पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट हा चांगला पर्याय ठरू शकतो. फॅशन स्ट्रीटवर जीन्स, टी-शर्ट, टॉप्स, ड्रेस, शर्ट, जॅकेट्स आणि विविध प्रकारचे फॅशनेबल कपडे उपलब्ध असतात. याशिवाय बॅग्स, बेल्ट, फुटवेअर, सनग्लासेस आणि इतर फॅशन अ‍ॅक्सेसरीजची खरेदीही येथे करता येते. या बाजारपेठेतील अनेक स्टॉल्सवर वेगवेगळ्या किमतींमध्ये कपडे मिळतात. त्यामुळे महागड्या ब्रँडेड कपड्यांऐवजी बजेटमध्ये नवीन फॅशन ट्राय करू इच्छिणाऱ्यांसाठी फॅशन स्ट्रीट आकर्षक ठरते.

5. महात्मा फुले मंडई

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्यांची खरेदी तुम्ही इथे करू शकता. येथे फुले, फळे, नारळ आणि विविध प्रकारचे पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करता येते. मंडईच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये झेंडूची फुले, फुलांच्या माळा, तोरणे आणि घर सजवण्यासाठी लागणाऱ्या पारंपरिक वस्तू उपलब्ध असतात. मंडई परिसरातून तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड या बाजारपेठांमध्येही जाता येते. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास एकाच दिवशी अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी पूर्ण करता येऊ शकते.


Inline Article Ad 728x90