Sukanya Peraneप्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण तापलं; ‘मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंना आरोपी करा’, संजय राऊतांचा ठाण्यात इशारा
ठाण्यात शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जाऊन मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी केली. पोलिसांशी चर्चेनंतर पूर्णेकर यांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप आणि संशयितांची नावे पुरवणी जबाबात नोंदवण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू असून राऊत यांनी केलेले आरोप अद्याप तपासाच्या अधीन आहेत.
.jpg)